देवगड महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी केली wwf प्रकल्पा अंतर्गत इंटरशिप कालावधी पूर्ण

98

देवगड महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी केली wwf प्रकल्पा अंतर्गत इंटरशिप कालावधी पूर्ण

देवगड (प्रतिनिधी)दि.१४ एप्रिल २०२४

World Wide Fund (WWF) या पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेबरोबर देवगड महाविद्यालयाने संयुक्त प्रकल्प करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत समुद्रातील मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी महिन्यात प्राथमिक सर्व्हे केला आणि मासेमारीमधील समस्या आणि आव्हाने यांचा अभ्यास केला. या WWF प्रकल्पामध्ये इंटर्नशिप केलेले सहभागी भूषण कोयंडे, ओंकार भिडे, नुपूर लळीत, दिक्षा केळुस्कर आणि रसिका कोयंडे यांना WWF कडून प्रा. विजयकुमार कुनुरे यांच्या हस्ते दि. १२ एप्रिल रोजी किट आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रकल्पासाठी WWF चे अधिकारी आदित्य काकोडकर आणि लिशा डाकोस्टा यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. देवगडमधील विविध मच्छीमार सहकारी संस्था व मच्छीमार व्यावसायिकांनी विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयातील प्राध्यापक नागेश दप्तरदार, डॉ. सुनेत्रा ढेरे, डॉ. नितीन वळंजू आणि गुरुप्रसाद घाडी यांनी देखील या प्रकल्पासाठी आवश्यक मार्गदर्शन केले