विजयदुर्ग बंदर विकास मंजुरी प्राप्त होताच ; विजयदुर्ग सह २२ गावातील जमिनी एचडीआयएल या कंपनीच्या दोन संचालकांनी खरेदी करून ती ३८ जणांच्या केली नावे ; जमीन व्यवहारात फसवणूक होत असल्याचा खरेदी व्यवहार अतुल रावराणे यांनी आणला सर्व प्रकार उजेडात
देवगड येथील पत्रकार परिषदेत रावराणे यांची माहिती
देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील विजयदुर्ग बंदर विकसित करण्याकरिता मंजुरी मिळाली असल्याचे समजताच विजयदुर्ग सह २२ गावातील जमिनी एचडीआयएल या कंपनीच्या दोन संचालकांनी खरेदी करून ती ३८ जणांच्या नावे केली होती.विजयदुर्ग बंदर विकसित होत असताना या जमिनी विजयदुर्ग पोर्ट प्रा.लिमी.या कंपनीला त्यानंतर विकण्यात येणार होती.दरम्यान एचडीआयएल कंपनीवर मुंबई मध्ये इडी ची कारवाई झाली.त्यामुळे जमीन खरेदी व्यवहार पूर्ण होऊनही हे व्यवहार अडकले.हे सर्व व्यवहार एका मोठ्या वजनदार नेत्याला हाताशी धरून होत होते यात फसवणूक होत असल्याची तक्रार अतुल रावराणे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी ,उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली होती .त्यातक्रारीला यश आल्याची माहिती शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जेणेकरून जनतेसमोर वस्तुस्थिती आणून या जमिनी ३८ जणांची नावे आहेत.या संदर्भात देवगड मधील २२ गावांमधील मिळकती या बेनामी व्यवहाराच्या आहेत.या संदर्भात संबंधित विभागाकडून चौकशी सुरू असून केंद्र शासनाच्या आर्थिक गुन्हे शाखा व सक्त वसुली संचनालय विभागामार्फत आर्थिक घोटाळ्याच्या चौकशी सुरू आहेत.या गावांमधील जमीनी मिळकती या जप्त करण्यात आल्या आहेत.तसेच त्यांचे कोणतेही व्यवहार दुययम निबंधक देवगड यांनी नोंदवून घेऊ नयेत असे आदेश झालेले आहेत.असे पत्र उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी १५ जाने.२०२१ च्या पत्राद्वारे दिले आहेत.असे सांगून जमीन खरेदी विक्री व्यवहार बाबत तालुक्यातील नागरिक शेतकरी मुंबईकर चाकरमानी यांनी सावधानता बाळगावी जेणेकरून या व्यवहारात फसवणूक होणार नाही असे ही अतुल रावराणे यांनी सांगितले. तसेच या जमीन व्यवहारात कणकवली मधील एक बड्या नेत्याने मुंबई येथे फायदा उठविला असल्याचेही श्री रावराणे यांनी सांगितले.
फोटो





