सामाजिक कार्यकर्ते संदीप साटम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
देवगड (प्रतिनिधी)) दि. ११ एप्रिल २०२४
शिरगाव येथील राजे ग्रुप शिरगाव व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे शिरगाव राजे ग्रुपचे पदाधिकारी संदीप प्रकाश साटम यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


राजे ग्रुपच्या वतीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे केक कापून आपले सहकारी सामाजिक कार्यकर्ते संदीप साटम यांचा वाढदिवस साजरा केला .यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे ५१ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. देवगड तालुक्यातील वळिवंडे येथील महेश दिनकर सावंत यांनी आतापर्यंत ३७ वेळा रक्तदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच त्यांनी आता आपला मुलगा भार्गव महेश सावंत याला ही रक्तदान शिबिरास उपस्थित राहून या सामाजिक कार्यात नेहमी आपले योगदान द्यायचे अशी सूचना दिल्याने त्यानेही प्रथम रक्तदानाचा अधिकार बजावला. महेश सावंत यांनी 37 वेळा रक्तदानाचा व व त्यांचा मुलगा भार्गव यांनी प्रथम रक्तदानाचा अधिकार बजावल्याने सामाजिक कार्यकर्ते संदीप साटम यांनी वडील व पुत्र यांचे दोघांचे विशेष अभिनंदन केले.

शिरगाव पंचक्रोशीतील सामाजिक कार्यात नेहमीच राजे ग्रुप सहभाग मोठा वाटा असतो.या रक्तदान शिबिरावेळी संदीप साटम, अमित साटम, मंगेश लोके, अमित कदम ,राजू शेटये, महेश शिरोडकर ,निलेश साटम, बंडू माने सुहास परब, देवदत्त कदम, महेश पवार, सुभाष नार्वेकर,सदानंद देसाई आधी उपस्थित होते.
राजे ग्रुपच्या वतीने उपस्थित रक्तदात्यांचे व सिंधुदुर्ग रक्तपेढी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.






