नाद भोळेवाडी येथील ६५ वर्षीय वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू
देवगड (प्रतिनिधी)दि ११ एप्रिल २०२४
सध्या एप्रिल मे महिन्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. या उष्णतेमुळे तीव्र प्रमाणात उखाडा ही जाणवत आहे. या उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून बरीच मंडळी दुपारी ११ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळतात.मात्र निव्वळ शेतीवरच ज्यांचा उदरनिर्वाह आहे. अशा कुटुंबांना हे बरेच वेळा शक्य होत नाही.आपली कामे वेळेत मार्गी लावावीत बरीचशी कामे अडून राहतात . याच उष्माघातामुळे देवगड तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील एका 65 वर्षीय वृद्धेच्या उष्माघातामुळे मृत्यू झालाय. स्मिता पाष्टे असे या उष्माघाताने मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
उपलब्ध माहिती नुसार,देवगड तालुक्यातील नाद-भोळेवाडी येथील जेष्ठ नागरिक स्मिता रघुनाथ पास्टे ( ६५) या काजूच्या बागेत काजू वेचण्यासाठी जात असताना वाढलेल्या उष्म्याच्या पाऱ्यामुळे दुपारी उष्माघाताने पडून त्यांचा मृत्यू झाला. त्या सायंकाळी बागेत मृतावस्थेत आढळून आल्या.त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे,सुना, नातवंडे असा परिवार आहे.





