निसर्गमित्र समिती सिंधुदुर्ग अध्यक्षपदी श्री रघुनंदन घोगळे यांची निवड

38

निसर्गमित्र समिती सिंधुदुर्ग अध्यक्षपदी श्री रघुनंदन घोगळे यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) दि.३ एप्रिल २०२४

महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज, राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी श्री रघुनंदन अंकुश घोगळे मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार देवगड यांची निवड करण्यात आली. या निवड समितीमध्ये संस्थापक अध्यक्ष श्री प्रेमकुमार अहिरे, प्रदेशाध्यक्ष श्री. डी आर पाटील, प्रदेश सचिव थी. आबासो संतोषराव पाटील यांनी धुळे येथून जाहिर केली
       श्री रघुनंदन अंकुश घोगळे हे गेली अनेक वर्षे, पर्यावरण संतुलन, वृक्षारोपण ,वृक्ष संवर्धन, वन्यप्राणी, पशुपक्षी,जंगलाची जोपासना, पाणी अडवा पाणी जिरवा, वनराई बंधारा, या जलसंधारणीच्या राष्ट्रीय कार्यात योगदान देत असून विद्यार्थ्यांमध्ये  समाजामध्ये याबाबत जनजागृती करीत आहेत. प्रदूषण नियंत्रण,
 प्लास्टीकमुक्त शाळा, तंबाखूमुक्त शाळा,सेंद्रीय खते निर्मिती, इत्यादी उपक्रम राबवित आहेत.