शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या, ग्राहक संरक्षण कक्ष सिंधुदुर्ग जिल्हासंघटक पदी ॲड.प्रसाद करंदीकर यांची नियुक्ती
देवगड (प्रतिनिधी) दि.२६ मार्च २०२४
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने
ग्राहक संरक्षण कक्ष सिंधुदुर्ग जिल्हासंघटक पदी ॲड.प्रसाद करंदीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
ऍड.प्रसाद करंदीकर यांनी यापूर्वी शिवसेना देवगड तालुकाप्रमुख, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हासंघटक म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे काम राज्यभर करत आहेत.
ग्राहक संरक्षण आणि कर्जदार -जामीनदार यांचे हक्क याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून ते कायदेशीर सल्ला देत आहेत. अनेक सामाजिक संस्था सोबत त्यांचे कार्य आहे.शिवसेना सचिव खा.विनायक राऊत, उपनेते- संपर्कप्रमुख श्री.अरूण दुधवडकर, उपनेत्या सौ.जान्हवी सावंत , आमदार वैभव नाईक यांनी संधी दिली याबद्दल त्यांनी आभार मानले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली त्या बद्दल आभार मानतो तसेच मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. शिवसेना नेते व ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांचेही आभार व्यक्त करतो.
ग्राहक संरक्षण चळवळ ही सिंधुदुर्गात तळागाळात रुजवून पक्ष बांधणी त्याद्वारे भक्कम पणे करणार आहे.
येत्या काही दिवसांत वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हा कार्यकारिणीची निवड करून, ग्राहक संरक्षण कक्षाची टीम, येत्या लोकसभा निवडणुकीत खा.विनायक राऊत यांच्या विजयी मताधिक्यात वाढ करण्यासाठी परिश्रम करेल.





