जामसंडे  पेट्रोल पंप येथे दुचाकीची पादचाऱ्याला  धडक ; पदचाऱ्याचा मृत्यू

719

जामसंडे  पेट्रोल पंप येथे दुचाकीची पादचाऱ्याला  धडक ; पदचाऱ्याचा मृत्यू

देवगड (प्रतिनिधी)दि ९ मार्च २०२४

जामसंडे पेट्रोलपंपनजिक दुचाकीची पादचाऱ्याला धडक बसून झालेल्या अपघातात जामसंडे वेळवाडी येथील ६५ वर्षीय अनंत श्रीधर तेली याना गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला .

             ही घटना ८ मार्च रोजी रात्री.८.१५ च्या सुमारास जामसंडे पेट्रोल पंप नजीक घडली. यातील दुचाकी स्वार दर्शन प्रदीप भोवर रा. जामसंडे विष्णुनगर हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन जात असताना हा अपघात घडला. दुचाकी अपघातातील पादाचारी यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णाला आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
           या घटनेची नोंद देवगड पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत.