माणसाची, बुद्धी शुद्ध ,निर्मळ असेल तरच भगवंत दर्शन होते.आणि त्याच्या हातुन सत्कर्मच घडते :- महेश कुंटे

113

माणसाची, बुद्धी शुद्ध ,निर्मळ असेल तरच भगवंत दर्शन होते.आणि त्याच्या हातुन सत्कर्मच घडते :- महेश कुंटे

समस्त कासार समाजाचे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी

कणकवली ( प्रतिनिधी)

 

माणसाची, बुद्धी शुद्ध ,निर्मळ असेल तरच भगवंत दर्शन होते.आणि त्याच्या हातुन सत्कर्मच घडते. मनाची तेजस्विता ही सुसंस्कारावर अवलंबून असते. सुसंस्कार ,माणसाच्या अज्ञानाची ताटी उघडून ज्ञानाचा सूर्यप्रकाश माणसाला देतात. त्यातूनच माणसाचे आचार विचार तेज :पुंज बनतात.असे प्रतिपादन लेखक तथा व्याख्याते सुप्रसिद्ध वकील श्री.महेश कुंटे यांनी केले.

श्री.कुंटे बोर्डवे कालिका मंदिर येथे‌ रथसप्तमी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी समस्त कासार ज्ञाती समाज वार्षिक कालिका अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर श्री चंद्रकांत कासार अध्यक्ष समस्त कासार ज्ञाती समाज, सावळाराम शिंदे अध्यक्ष कालिका देवी मंदिर देवस्थान कमिटी,दीपक बूकम, गजानन शिंदे,शरद साळवी , नरेश येंडे , विठ्ठल मेंढे, सखाराम येंडे ,सागर कारेकर, स्वप्निल शिंदे , यशवंत हजारे, अनिल शिंदे ,महेश कासार, तुकाराम तिवरेकर, गिरीश एकावडे, प्रवीण आरविंदेकर, नागेश साळवी, शंकर हजारे ,हर्षद कासार, सत्यवान येंडे ,श्रेया राठवड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना कुंटे म्हणाले,की कालिका देवी ही उपास्य देवता आहे.सुर्याच्या तेजा प्रमाणे तेजोमय असे देवीचे रुप आहे.,.रथसप्तमी उत्सव हा तेजाचा उत्सव आहे. इथल्या भक्तीमय वातावरणाने आपण भारावून गेलो आहे.

आपण मला कुटुंबातील व्यक्ती पेक्षाही प्रेम दिलात, आपला प्रमुख घटक बनवलात. हे मी माझे भाग्य समजतो.

गेली दहा वर्षे सातत्याने कालिका अंक प्रकाशित करुन या अंकाचा दर्जा उंचावत राहावा म्हणून अंकात विज्ञान, अध्यात्म, पर्यावरण, संस्कार ,अंधश्रद्धा आणि समाजाचा इतिहास इत्यादी विषयांना स्पर्श करण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.समस्त कासार ज्ञाती समाजाचे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे.असे गौरवोद्गार श्री.कुंटे यांनी काढले.

व्यासपीठावर श्री चंद्रकांत कासार अध्यक्ष समस्त कासार ज्ञाती समाज, सावळाराम शिंदे अध्यक्ष कालिका देवी मंदिर देवस्थान कमिटी,दीपक बूकम, गजानन शिंदे,शरद साळवी , नरेश येंडे , विठ्ठल मेंढे, सखाराम येंडे ,सागर कारेकर, स्वप्निल शिंदे , यशवंत हजारे, अनिल शिंदे ,महेश कासार, तुकाराम तिवरेकर, गिरीश एकावडे, प्रवीण आरविंदेकर, नागेश साळवी, शंकर हजारे ,हर्षद कासार, सत्यवान येंडे ,श्रेया राठवड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री.महेश कुंटे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन श्री कालिका देवी मंदिर देवस्थान कमिटी बोर्डवे आणि समस्त कासार ज्ञाती समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सावळाराम येंडे म्हणाले की,महेश कुंटे हे उत्कृष्ट व्याख्याते लेखक,अभिनेते असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.

अमेरिका आणि शिकागो येथे कोकणची गावरहाटी आणि इतिहास या विषयावर झालेले व्याख्यानाचा आढावा उगवत्या शैलीत श्री सावळाराम येंडे यांनी घेतला.

कुंटे यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 पुरस्कार मिळाले असून जिल्ह्यासह राज्यभरात त्यांची व्याख्याने झाली आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आम्हाला लाभले. हे आम्ही आमचे भाग्य समजतो. असे गौरवोद्गार येंडे यांनी काढले.

यावेळी समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदवीत्तर,विशेष प्राविण्य धारक, विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी लहान मुलांनी रेकॉर्ड डान्स सादर केले.आणि उपस्थितांची दाद मिळवली.त्यांना ही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
श्री कालिका देवी मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.