साटेली येथील वळणावर दोन दुचाकी मध्ये अपघात ; चार जण जखमी एका लहान मुलाचा समावेश
मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी आपल्या गाडीतून जखमींना हलविले प्राथमिक रुग्णालयात….
देवगड (प्रतिनिधी)
साटेली येथील धोकादायक वळणावर दोन दुचाकी मध्ये धडक बसून अपघात झाला . या अपघात चार जण जखमी झाले आहेत.हा अपघात आज शुक्रवार दि.२३फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाला.
गोव्याच्या दिशेने पेंडूर येथील नाईक युवक हा आपली दुचाकीची घेऊन भरधाव वेगाने साटेली येथील धोकादायक वळणावर ओव्हरटेक करत असताना मळेवाडहून साटेलीच्या दिशेने जाणाऱ्या जाधव नामक व्यक्तीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेमध्ये चार जण जखमी झाले असून यात एका लहान मुलाचा समावेश आहे.या जखमी मधील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.दुखापतग्रस्तांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात देण्यासाठी ॲम्बुलन्सची वाट न पाहता मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी आपल्या खाजगी चार चाकी गाडीमध्ये सदर अपघात असताना घालून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिक उपचारासाठी दाखल केले.अपघातात दोन्ही दुचाकीचे नुकसान झाले आहे.





