महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार जाहीर ;  प्राथमिक विभागात जि.प. कातवणेश्वर शाळा प्रथम, आरे देवीची वाडी शाळा द्वितीय, तर माध्यमिक विभागात श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल प्रथम.

327
महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार जाहीर
 प्राथमिक विभागात जि.प. कातवणेश्वर शाळा प्रथम, आरे देवीची वाडी शाळा द्वितीय, तर माध्यमिक विभागात श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल प्रथम
देवगड दि. २१ ( प्रतिनिधी )
           राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक ,  पालक , विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा देवगड तालुकास्तरीय *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* या पुरस्काराची  घोषणा झाली असून. माध्यमिक विभागांमध्ये जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेने प्रथम क्रमांक तर प्राथमिक विभागामध्ये जिल्हा परिषद शाळा कातवणेश्वर कुणकेश्वर या शाळेने प्रथम क्रमांक तर जिल्हा परिषद शाळा आणि देवीची वाडी या शाळेने द्वितीय क्रमांक संपादन केला आहे.
             रोख रुपये तीन लाख व गौरव पत्र असे प्रथम क्रमांकाच्या तर रोख रुपये दोन लाख व गौरव पत्र असे द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्काराने या शाळांना  लवकरच सम्मानित केले जाणार आहे .
           राज्य शासनामार्फत “भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ”  योजनेअंतर्गत *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* हे अभियान अलीकडेच राबविण्यात आले.या अभियानात गोगटे प्रशालेने शैक्षणिक गुणवत्ता , अध्ययन / अध्यापन / प्रशासन , यात आधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर , शालेय सौंदर्यीकरणा बरोबरच अमृत वाटिका , गांडूळ खत प्रकल्प , पर्यावरण संवर्धनाची जाणीव , सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता , चांगले आरोग्य , राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न , व्यवसाय शिक्षण , अंगभूत कला – क्रीडा गुणांचा विकास ,क्षेत्रभेट याहून अधिक घटकांची परिणामकारक अंमलबजावणी केल्याने गोगटे प्रशाला देवगड तालुक्यात प्रथम पुरस्काराची  मानकरी ठरली ,
         जामसंडे प्रशालेला  प्राप्त झालेल्या या पुरस्कारा बद्दल संस्थाध्यक्ष अँड अजित गोगटे,सचिव प्रवीण जोग , शाळा समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर , मुख्याध्यापक श्री.संजय गोगटे यांनी सर्व विद्यार्थी ,शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक ,माजी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.तर कातवणेश्वर शाळा समिती व्यवस्थापक यांनी शिक्षक वृदांचे अभिनंदन केले.