देवगड दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचा शनिवार २४ फेब्रुवारी रोजी कोनशिला समारंभ
सर्वोच्च न्यायालय दिल्ली व उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्तींची असणार प्रमुख उपस्थिती
देवगड (प्रतिनिधी)
देवगडच्या इतिहासाची साक्ष ब्रिटिश पूर्वकाळातील १८७७ मधील देवगड दिवाणी न्यायालयाची इमारत जीर्ण झाल्याने या ठिकाणी सुसज्ज अशी आधुनिक तंत्रज्ञानाचा व भविष्याचा विचार करून सुसज्ज अशी देवगड दिवाणी न्यायालयाची नवीन वास्तू उभी राहणार आहे. देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय नवीन वस्तूचा कोनशिला समारंभ शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता जुनी दिवाणी न्यायालय देवगड इमारत परिसरात शासकीय गोडाउन जवळ या ठिकाणी होणार असून या कोनशिला समारंभास सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या कोनशिला कार्यक्रमास सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय , सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती नितीन बोरकर, व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्गचे हेमंत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती देवगड तालुका बार असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अँड देवानंद गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवगड दिवाणी न्यायालय येथील वकील कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी यावेळी अँड अजित गोगटे,अँड अविनाश माणगावकर, अँड प्रकाश बोडस,अँड रुपेश राणे , अँड प्रसाद करंदीकर, अँड आशिष लोके,अँड सिद्देश माणगावकर आदी उपस्थित होते.
या कोनशिला समारंभास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघटना, अधिकारी लोकप्रतिनिधी शासकीय निमशासकीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन नंदा घाटगे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी देवगड, अँड देवानंद गोरे देवगड तालुका वकील संघ अध्यक्ष यांनी केले आहे.





