कॉंग्रेसमध्ये राहून माझी बारा वर्षे फुकट गेली : नारायण राणे

आंगणेवाडी : आंगणेवाडी जत्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंनदोत्सव मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपले काही मागील राजकिय कारकीर्द आणि काही अनुभव देखील कथित केले. दरम्यान बोलताना ते अस म्हणाले, कॉंग्रेस मध्ये राहून माझी बारा वर्षे फुकट गेली. यापुर्वी या ठिकाणी आलो असतो तर आणखी बदल दिसला असता. मात्र आता भाजपा हा शेवटचा पक्ष आहे. यापुढे अन्य कुठच्याही पक्षात जाणार नाही. कोणी ऑफर दिली तरी दगा फटका होणार नाही. जिल्ह्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून माझा पुढील प्रवास असेल. मी या सर्व प्रवासाचा वारकरी आहे, असे अभिवचन देशाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिले.

दरम्यान माझ्याकडे सुक्ष्म खाते आहे, अशी टिका होते. परंतु माझ्या एकाच विभागाचे पाच लक्ष बजेट आहे. तर अन्य विभागाचे बजेट वेगळे आहे. त्यामुळे माझ्यावर टिका करताना विचार करा माझी पात्रता असल्याने मला पद दिले. मी कधी मातोश्रीच्या बाहेर वेटींग लिस्टवर राहिलो नाही, असे सांगत मी केंद्रात आणि राज्यात कोणत्याही मंत्र्याला फोन लावला तर माझे काम होते. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात कोठेही खंड पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

आंगणेवाडी जत्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंनदोत्सव मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले जिल्हा भाजपाच्या माध्यामातून आज आंनदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके वाजविले जात आहेत,परंतू आम्हाला वेगळे फटाके वाजविण्याची सवय आहे. या ठिकाणी भाजपात आलो हीच अडचण आहे. या ठिकाणी आल्यानंतर सहनशिलता ठेवावी लागते. अन्यथा चित्र वेगळे दिसले असते, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी ते पुढे म्हणाले, माझ्याकडे सुक्ष्म, लघू खाते आहे, असे सांगून हिणवले जाते. तसेच मला शिवसेनेमुळे मंत्रीपद दिले गेली, असे सांगितले जाते. मात्र माझ्याकडे तेवढी पात्रता असल्यामुळेच मला मंत्रीपदे मिळाली. मी कोठे ही मातोश्रीवर लाईन मध्ये राहून मला मंत्रीपद द्या, अशी मागणी केली नाही. त्यामुळे कोणी तशा प्रकारची टिका करीत असेल तर ती सहन केली जाणार नाही. त्याच पध्दतीने उत्तर दिले जाईल.

मला जिल्ह्याचा आणि पर्यायाने कोकणचा विकास करायचा आहे. त्यामुळे अनेक योजनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये मी या ठिकाणी आणले आहेत. आणि भविष्यात आणणार आहे. राणेंनी फोन करून सांगितल्यानंतर कोणत्या मंत्र्याने काम केले नाही, असे होणार नाही तर त्यांच्याकडुन आर्वजून ते काम केले जाते. याचा मला आनंद आहे, असे ही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, अतुल काळसेकर, मनिष दळवी, अजित गोगटे, विनय नातू, प्रभाकर सावंत, प्रमोद जठार आदी उपस्थित होते.