गिर्ये, रामेश्वर,पडेल येथे व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती

95

गिर्ये, रामेश्वर,पडेल येथे व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती

२६ व २७ फेब्रुवारीला केले आयोजन

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोशियन देवगड, यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील दोन गावांमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे कायदेशीर जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे.२६ फेब्रुवारी रोजी गिर्ये ग्रामपंचायत व रामेश्वर ग्रामपंचायत येथे तर २७ फेब्रुवारी रोजी पडेल ग्रामपंचायत येथे मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
गिर्ये ग्रामपंचायत येथे २६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित शिबिरात अँड कौस्तुभ मराठे,अँड गिरीश भिडे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर रामेश्वर ग्रामपंचायत येथे सकाळी ११:३० वाजता आयोजित शिबिरात अँड संगीता कातेकर,अँड अन्वि कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. २७ रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रामपंचायत पडेल येथे आयोजित मोबाईल लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग देवगडचे श्रीमती एन. बी. घाटगे व पॅनल सदस्य म्हणून अँड मैथिली खोबरेकर हे काम पाहणार आहेत. या मोबाईल व्हॅन लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील तसेच वादपूर्व प्रकरणी ठेवण्यात आली आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवगड दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. बी. घाटगे यांनी केले आहे.