विहिरीत पडलेल्या इचलकरंजीच्या तरुणाला मिळाले जीवदान
बांदा(मंगल कामत)दि १० फेब्रु. २४
काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. असेच काहीसे जवाहरनगरच्या इचलकरंजीच्या शुभम रमेश भोसले यांच्या बाबतीत म्हणावे लागेल. बांदा-गवळीटेम्ब येथील विहिरीत रात्रीच्या वेळेत पडलेल्या शुभम रमेश भोसले या तरुणाला बांदा पोलिसांनी आणि नागरिकांनी धावपळ करून जीवदान दिले.दिं ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ११ वा.६ मिनीटानी डायल ११२ पोलीस ठाण्यात कॉल आला तो कॉल साईज अशोक सावंत राहणार बांदा याचा होता. त्यात त्याने बांदा गवळीटेम्ब येथे एक अनोळखी व्यक्ती खोल विहिरीत पडलेला आहे व तो आरडाओरड करत आहे असा मेसेज होता . पोलीस हवालदार विक्रम गवस यांनी सोबत अंमलदार रोहित कांबळे व होमगार्ड मनोज डोईफोडे यांना घेऊन पोलीस ठाणे मधील भंडारातील बचाव साहित्य बॅटऱ्या असे साहित्य घेऊन तत्काळ घटनास्थळी गवळीचे टेम्ब या ठिकाणी अकरा वाजून तेरा मिनिटांनी म्हणजे सात मिनिटात पोहोचले तेथील परिस्थितीची पाहणी केली असता ती विहीर अशोक सावंत यांच्या शेतातील होती .सुमारे 50 फूट खोल पाण्याने भरलेली होती या विहिरीच्या पाण्याचा वापर बरीच वर्ष होत नसल्यामुळे विहिरीच्या बाजूला आजूबाजूला झाडे जुडी भरपूर वाढलेली होती आज विहिरीत पडलेली व्यक्ती लोकांनी टाकलेल्या दोरीला पकडून धडपडत होती धडपडून धडपडून तो दमलाई होता विहिरीत पायऱ्या नसल्यामुळे व अन्य आधार न होता तो बाहेर पडण्यासाठी आरडाओरडा करू लागला त्याची ती ऑर्डर ऐकून साई सावनेर यांनी विहिरीजवळ येऊन पाहून त्याला आधार देण्यासाठी त्यांनी घरातील जोडी सोडली होती. त्याच विहिरीला तो पकडून होता
त्यानंतर बांदा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन लाईफ जॅकेटवर रिंग व या दोरीच्या साह्याने सोडून त्याला आधार दिला त्यावेळी तो थोडा सावरला मात्र विहीर खोल त्याला वर चढणे अशक्य होते. अशावेळी तेथील उपस्थित असलेल्या युवक सर्वेश नाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता विहिरीत उतरण्याची तयारी दाखवली त्याला लाईफ जॅकेट घालून दोरीच्या साह्याने विहिरीत उतरवले व सर्वेश नाईकच्या साने पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. सदर व्यक्तीचे नाव श्री परशुराम भोसले राहणार जवाहर नगर इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर असे आढळून आले. तो आपल्या अन्यमित्राबरोबर गोवा फिरायला गेला होता व परत जाताना दारूच्या नशेत त्यांचे वाद विवाद होऊन शुभम भोसले हा बांदा गडगेवाडी येथील येथे गाडीतून खाली उतरला व बाकीचे मित्र त्याचे गावी जाण्यास निघाले त्यानंतर शुभम भोसले रस्त्याची शेजारी असलेल्या धुळपात जाण्यासाठी पुढे गेला त्याला काळोखात अंदाज न आल्यामुळे त्याने कंपाउंड समजून सदर विहिरीचा कठडा ओलांडला व खोल विहिरीत पडला. या विहिरीत पडलेल्या युवकाला वाचवण्याचे मुलाचे कार्य श्री सर्वेश नाईक व साई सावंत यांनी केले तसेच सुमित राजा नाईक शुभम नाईक मुकुंद सावंत मंदार केसरकर व गवळी टेम्ब ग्रामस्थ आदी नागरिकांचे सहकार्य लाभले योग्य वेळी बांदा पोलिसांची मदत मिळाल्यामुळे सदर युवक वाचला म्हणतात ना काळाला होता पण वेळ आली नव्हती.






