गोव्याहून बीडच्या दिशेने दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत गोवा बनावटीच्या चोरट्या दारूच्या वहातूकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून रामचंद्र वाठ्ठल खाडे या संशयीतासह 8 लाख 50 हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.
बांदा : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी,संचालक प्रसाद सूर्वे याच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर वहानानची तपासणी करत असता एम.एच.23 ए.डी.0815 हि बलेरो गाडी आली असता गाडी थांबवण्याचा ईशारा केला.मात्र चालकाने गाडी नथाबवता कुडाळच्या दिशेने भरधाव वेगात पळुन गेला.गाडी पळवल्याने संशय आल्याने गाडीचा पाठलाग करून गाडीच्या समोर गाडी घालुन अडविण्यात आली.गाडीची झडती घेतली असता ड्रायव्हर सिटच्या मागे व हौद्यामध्ये गोवाबनावटीची चोरटी दारू सापडुन आली. चोरट्या दारेची वहातूक करत असल्याने 3 लाख रूपये किमंतीची चोरटी दारू 5 लाख 50 हजार रुपये किमंतीची गाडी मीळुन 8 लाख 50 रूपयाच्या मुद्देमालासह रामचंद्र विठ्ठल खाडे वय 45 वर्षे राहाणार घागरवाडा जि.बिड या संशयीताला ताब्यात घेण्यात आले.सदरची कारवाई निरिक्षक मिलिंद गरूड,दुय्यम निरीक्षक प्रदिप रास्कर, दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रणजीत राणे, जवान दिपक वायदंडे यांनी केली.अधीक तपास प्रदिप रास्कर करत आहेत.





