शिरगांव हायस्कूल शिरगांवच्या विद्यार्थ्यांनी शासकीय रेखा परीक्षेत संपादन
देवगड (प्रतिनिधी)
शिरगांव हायस्कूल शिरगांवच्या विद्यार्थ्यांनी शासकीय रेखा परीक्षा २०२३ मध्ये उज्वल यश संपादन केले.
सन २०२३-२४ साठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखकला परीक्षेत आमच्या प्रशालेची एकूण ६१ विद्यार्थी प्रविष्ठ झाली होती त्यापैकीएलिमेंट्री परीक्षा ( पहिली परीक्षा) A श्रेणी :- २ विद्यार्थी,
B श्रेणी :-८ विद्यार्थी,C श्रेणी :- ८ विद्यार्थी तर इंटरमीजेट परीक्षा( दुसरी परीक्षा)A श्रेणी :- ९ विद्यार्थी,B श्रेणी :- १७ विद्यार्थी,C श्रेणी :- १३ विद्यार्थी असे एकूण या परीक्षेत ४२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत .यातील १ विद्यार्थी परीक्षेत अनुपस्थित राहिला.या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक श्री विनोद चौगुले सर यांचे
मार्गदर्शन करणारे लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, व शिक्षक वृंदाने अभिनंदन केले.





