बोगस औषधे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा मनसेचे तालुका कृषी विभागाला निवेदन

217

बोगस औषधे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा मनसेचे तालुका कृषी विभागाला निवेदन

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यातील कलम बागेमध्ये हापूस आंबा फळावर थ्रीप्स कीटक असल्याकारणाने त्याची दर्जाहीन औषधे प्रयोगशाळेत फेर तपासणीस पाठवून त्याची चाचणी करण्यात यावी व तसा अहवाल आंबा बागायत दाराना देण्यात यावा.
त्याचप्रमाणे बोगस औषधांची विक्री सुरू असून या विक्री करणाऱ्यांची तपासणी करून त्यांच्या योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी तालुका कृषी अधिकारी तालुका कृषी कार्यालय देवगड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे काही नवीन कंपन्यांनी
फळबागायतीकरिता, फळ टिकण्या करिता ,फळ वाढीकरिता तसेच झाडावरील कीटक नाहिसे होण्याकरता व फळ मोठी झाल्यावर त्याचा योग्य असा रंग चढण्याकरता नवनवीन औषधे निर्माण केली असून ती बाजारात विक्री करिता काही संस्था मार्फत तसेच काही खाजगी व्यापारी वर्गाकडून विक्रीस ठेवलेली आहेत . परंतु प्रत्यक्ष वस्तूस्थिती पाहिली असल्यास त्यातील काही औषधांचा अजिबात उपयोग होत नाही. तसेच झाडावर कोणताही परिणाम होत नाही .
औषध झाडावर सध्याच्या औषध फवारणी केली गेल्यानंतर त्याचा काडी मात्रही परिणाम होत नसून दोन दिवसांनी किंवा दुसऱ्या दिवशी पाहिल्यास सदर झाडावरील मोहोर किंवा ज्या झाडांना फळे धारणा झालेली आहे .त्याच्यावरील कणी व बारीक सुपारीच्या आकाराची फळे गळून पडलेली दिसतात .अशी जी नवीन नवीन औषधे बाजारात विक्रीसाठी आलेली आहे ती नमुना म्हणून प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी करून घ्यावी . औषधी वापरून आंबा बागायतदार नुकसानीत आर्थिक संकटात सापडलेला आहे. या बोगस औषधांची विक्री तात्काळ थांबवावी अन्यथा मनसे स्टाईलने ही विक्री थांबवण्यात येईल. त्यावेळी सर्वस्वी कृषी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यानंतर त्याने घेण्यात आला .
यावेळी तालुका उपाध्यक्ष राजा मोंडकर , विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर,परेश आडकर,शाखा अध्यक्ष तेजस खोत,एकनाथ खोत,अजय कातवणकर ,राजन पवार व अन्य बागायतदार उपस्थित होते.