मिठबाव येथे १५ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय डान्स स्पर्धा

444

मिठबाव येथे १५ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय डान्स स्पर्धा

मिठबाव व्यापारी मित्रमंडळाचे आयोजन

देवगड (स्वप्नील लोके) दि ५ फेब्रुवारी २०२४

देवगड तालुक्यातील व्यापारी मित्र मंडळ मिठबावचा नववा वर्धापन दिन गुरुवार १५ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन मिठबाव बाजारपेठ येथे करण्यात आले आहे .
यानिमित्त सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती ,तीर्थप्रसाद, महाप्रसाद ,महिला हळदीकुंकू, समारंभ स्थानिक भजने, तसेच रात्री साडेनऊ वाजता भव्य राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ८००० रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ६००० रुपये व आकर्षक चषक ,तृतीय क्रमांक ४००० रुपये व आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक २००० रुपये व आकर्षक चषक, तर उत्तेजनार्थ दोन क्रमांक काढण्यात येणार असून त्यांना प्रत्येकी रुपये १००० व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सोलो स्पर्धक ११ वर्षापासून पुढे तर जोडी स्पर्धकांना वयाची अट नाही.तरी स्पर्धेसाठी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे ८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत श्री विनोद लोके ९१३७२६३९७७ , व अनया जेठे ९४२३९२०३५४ यांच्या जवळ नोंदवावी असे आवाहन मिठबाव व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.