मिठबावमध्ये ग्रीन पार्क स्टेडियमवर ६ ते १० फेब्रुवारी या कालावधित रंगणार राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेटचा थरार….
मिठबांव रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धेचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
देवगड (प्रतिनिधी)
श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबांव व मिठबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित १९ वी डे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत मिठबाव ग्रीन पार्क स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे,
कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे,
राज्यात नामांकित क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ३ लाख व चषक, द्वितीय क्रमांक १ लाख ५०.००० व चषक,इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेत उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव अध्यक्ष तथा सरपंच महादेव उर्फ भाई नरे यांनी केले आहे.





