इन्सुली कुडव टेंम्ब येथील ३४ वर्षीय युवकाची  गळफास लावून आत्महत्या 

151

इन्सुली कुडव टेंम्ब येथील ३४ वर्षीय युवकाची  गळफास लावून आत्महत्या 

बांदा (प्रतिनिधी) दिनांक ४ फेब्रुवारी २०२४

इन्सुली कुडव टेंम्ब येथील संदेश एकनाथ कळगुंटकर (वय ३४) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सावंतवाडी तालक्यातील इन्सुली कुडव टेंम्ब येथील संदेश एकनाथ कळगुंटकर (वय ३४) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी घडली.संदेशला दारुचे व्यसन असून तो घरी आई समवेत रहायचा.या घटनेची खबर बांदा पोलिसांत दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.मात्र संदेश याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.या घटनेचा तपास बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे करत आहे.