ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा देवगड येथे वकिलांचे शासनाला निवेदन

171

ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा देवगड येथे वकिलांचे शासनाला निवेदन

देवगड प्रतिनिधी

अहमदनगर येथील आढाव या वकील दांपत्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा देवगड तालुका बार असोसिएशन तर्फे निषेध नोंदवण्यात आला. व निषेधाचे निवेदन देवगड तहसीलदार आर .जे.पवार यांना देण्यात आले. या निवेदनाद्वारे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तातडीने लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,मौजे राहुरी ता. अहमदनगर येथे राहणारे व वकीली व्यवसाय करणारे दांपत्य अँड. राजाराम आढाव व अँड. मनिषा आढाव यांची गुरूवार दि.२५ जानेवारी रोजी निघृण हत्या करणेत आली आहे.
प्रस्तुत वकीली दांपत्यांच्या झालेल्या या निघृण हत्येचा देवगड तालुका बार असोसिएशन तीव्र निषेध करीत आहे.सदर हत्याकांडाचा सखोल तपास होवुन सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी व त्यांचेवर पुढील कायदेशिर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी सर्व वकील सदस्यांची आग्रही मागणी आहे.दिवसेंदिवस राज्यात वकीलांवर हल्ले करणे, धमकाविणे, त्रास देणे असे प्रकार वाढत चालले आहेत. आढाव वकील दांपत्यांच्या झालेल्या निघृण हत्येमुळे यांची दाहकता अधिक प्रकर्षाने समोर आलेली आहे.
वकीलांच्या संरक्षणाकरिता ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळरित्या लागू करणे आता अत्यावश्यक बनलेले आहे व सदर कायदयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाल्यास वकीलांच्या मनात निर्माण झालेली भिती दूर होवुन त्यांना व्यवसाय करताना संरक्षणाची हमी मिळणारी आहे. तरी प्रस्तुत वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करणेत यावा
हे निवेदन देवगड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवानंद गोरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट सिद्धेश अविनाश माणगावकर, ॲडव्होकेट गिरीश भिडे, ॲडव्होकेट आशिष लोके, ॲडव्होकेट शामसुंदर जोशी,ॲडव्होकेट मैथिली खोबरेकर, ॲडव्होकेट अन्वी कुलकर्णी,
ॲडव्होकेट ऋतुजा खाडिलकर,ॲडव्होकेट विणा लिमये,ॲडव्होकेट संगीता कालेकर व अन्य सदस्य उपस्थित होते.