कणकवली आगरातून ११:३० वाजेपर्यंत ३० बस गाड्या भराडी देवीच्या भक्तांना घेऊन मार्गस्थ…!

कणकवली, मयुर ठाकूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई भराडी देवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालीय. आई भराडी देवीच्या जत्रोत्सवासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज होतो. तर त्यात मोठा मोलाचा वाटा ठरणारा एसटी महामंडळ देखील शटल सर्व्हिसच्या माध्यमातून प्रवाश्यांना आई भराडी देवीच्या मंदिरापर्यंत सोडत आहे.

आताची अपडेट पाहिली असता कणकवली आगारातून आंगणेवाडी यात्रा स्पेशल सकाळी ११:३० वाजेपर्यंत तब्बल ३० बस गाड्या सोडण्यात आल्या. तुडुंब गर्दीने या बसगाड्या भरून आई भराडी देवीचे भक्त जाताना पाहायला मिळाले. तरीही एवढ्यावरच न थांबता एवढी तयारी करून देखिल बस गाड्या कमी पडल्या आहेत. आणि भराडी देवीच्या भक्त गणांची लांबच्या लांब रांग लागली असल्याचे चित्र पाहायला मिळतंय.