सिंधुदुर्ग : पंचायतराज बाबत विद्यार्थ्यांना अधिक माहिती व्हावी त्यासाठी पंचायतराज कार्यशाळेचे आयोजन उपपरिसर सिंधुदुर्ग मुंबई विद्यापीठ समाजकार्य विभागाच्यावतीने आज करण्यात आले होते.
या कार्यशाळेला प्रमुख पी. व्ही. मंडलिक ट्रस्ट, मुंबई यांचे व्याख्याते म्हणून श्री.अल्लाउद्दीन शेख, श्री. हरिहर वाटवे, श्रीम. साधना वैराळे, हे लाभले होते. कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष विद्यार्थिनी मयुरी परब हिने केले तर प्रास्ताविक समाजकार्य विभागाचे प्रा.अमर निर्मळे यांनी केले. चर्चासत्राच्या व्याख्यात्यांची ओळख अनुक्रमे सोपान निवळकर, रसिका आयरे आणि श्रीश कांबळे यांनी केली. समाजकार्य विभागाच्या प्राध्यापक वृंदाने व्याख्यात्यांचे स्वागत केले.
श्री.हरिहर वाटवे यांनी पंचायत राजची व्यापक भूमिका आणि गाव विकास आराखडा, श्रीम.साधना वैराळे यांनी 73 व्या घटनादुरुस्तीने झालेले बदल आणि श्री. अल्लाउद्दीन शेख यांनी ग्रामसभा आणि विविध समित्या यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून युवक काय करू शकतात या विषयावर उपस्थित समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये गटचर्चा घडवून आणली.
आकाश मंणचेकर, वरदा आरडे, सुकन्या ओळकर, आशिष सावंत या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाबद्दल आपली मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना पंचायतराजची संकल्पना तसेच ग्रामीण भागात काम करताना कसे केले पाहिजे याविषयी माहिती मिळाली. कार्यक्रमाचे सांगता आभार प्रदर्शनाने झाली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेश भालिंगे या विद्यार्थ्याने केले. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्रीम.अर्पिता मुंबरकर याचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग उपपरिसराचे प्रभारी संचालक श्री. श्रीपाद वेलींग याचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे आणि प्रा. पूनम गायकवाड यांनी केले.





