दोडामार्ग : बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ बांदा या संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर यांच्या हस्ते कळणे गावची कन्या नम्रता सावंत हिचा कोकण बोर्डात एमसीव्हीसी डेव्हलपमेंट मध्ये मुलीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली येऊन सिंधुदुर्ग जिल्हाचे नाव उज्वल केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तीला मार्गदर्शन करणारे वसकर सर, परब सर, भिसे मँडम यांचाही सत्कार करण्यात आला.
नम्रता सावंत हिने या अगोदरही वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हाभरात उत्तुंग यश मिळवले असून सावंत हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.





