देवगड तालुका स्तरीय बाल कला क्रीडा महोत्सव उत्साहात

147

देवगड : देवगड तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2022, दिनांक 29 व 30 डिसेंबर रोजी येथील शेठ  म. ग. हायस्कूलच्या मैदानावर व गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात उत्साहात पार पडला. दिनांक 29 डिसेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते तसेच पोलीस निरीक्षक देवगड निळकंठ बगळे, यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफी  व प्रमाणपत्रांचे ,मेडल्स चे देणगीदार  जे. एम. कुळकर्णी मेडिकल देवगडचे किशोर कुलकर्णी शिल्पा कुलकर्णी एडवोकेट अन्वी कुलकर्णी, अभय कुलकर्णी, पंचायत समिती देवगडचे प्रशासन अधिकारी संतोष बिर्जे , लेखाधिकारी श्री रमेश उपलवार सहाय्यक प्रशासन अधिकारी कुणाल मांजरेकर , पी एल मुणगेकर , सौ मेधा राणे, विस्ताराधिकारी जंगले, जगताप काळे, गटशिक्षणाधिकारी प्रजापती, थोरात सर्व केंद्रप्रमुख सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी सुमारे 1000 विद्यार्थी स्पर्धक, त्यांचे पालक, ग्रामस्थ, मार्गदर्शक शिक्षक, शेठ मग हायस्कूलचे मुख्याध्यापक राऊत , पर्यवेक्षक, घस्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

29 डिसेंबर रोजी मैदानी स्पर्धा पार पडल्या यामधे लहान गट व मोठा गटाच्या वैयक्तिक व सांघिक खेळांच्या स्पर्धांचा समावेश होता. हा निकाल पुढील प्रमाणे.

50मी धावणे मुलगे
स्वामिराज खोत प्रथम, मिठबाव प्रभाग ,कौशल संदीप चोपडे द्वितीय प्रभाग देवगड वरद महेश मांजरेकर तृतीय पडेल प्रभाग.
50मी धावणे मुली
अक्षरा संदीप पाळेकर प्रथम प्रभाग फणसगाव वैष्णवी मनिष वारीक द्वितीय पडेल प्रभाग, श्रावणी मंगेश सावंत तृतीय मिठबाव  प्रभाग.
100मी धावणे मुलगे
रोशन नेरुरकर प्रथम पडेल प्रभाग. हर्ष मणचेकर द्वितीय फणसगाव प्रभाग. दिव्येश चिंदरकर तृतीय मिठबाव प्रभाग .
100मी धावणे मुली
स्नेहा कानडे प्रथम ,पडेल प्रभाग .वैष्णवी वारिक द्वितीय ,पडेल प्रभाग.दिव्या परब तृतीय शिरगाव प्रभाग .
लांब उडी मुलगे
मंदार चव्हाण प्रथम ,शिरगाव प्रभाग.केतन थोटम द्वितीय पडेल प्रभाग.यश घाडी तृतीय देवगड प्रभाग.
लांब उडी मुली
अक्षरा अनभवणे प्रथम ,देवगड प्रभाग .स्नेहा कानडे द्वितीय ,पडेल प्रभाग .श्रावणी सावंत तृतीय मिठबाव प्रभाग .
उंच उडी मुलगे
आर्यन तांबे प्रथम ,फणसगाव प्रभाग .सिद्धार्थ फणसेकर, द्वितीय ,पडेल प्रभाग,समर्थ साटम तृतीय शिरगाव प्रभाग .
उचं उडी मुली
दुर्वा मिठबावकर प्रथम ,पडेल प्रभाग,.गार्गी बाईत द्वितीय मिठबाव प्रभाग .दिव्या परब तृतीय शिरगाव प्रभाग
कबड्डी मुलगे
पडेल प्रभाग विजेता.देवगड प्रभाग उप विजेता.
कबड्डी मुली
पडेल प्रभाग विजेता  .देवगड प्रभाग उपविजेता .
खो खो मुलगे
पडेल प्रभाग विजेता.फणसगाव प्रभाग उपविजेता
खो खो मुली
फणस गाव प्रभाग विजेता .पडेल प्रभाग उप विजेता  .
रिले मुलगे
पडेल प्रभाग विजेता.देवगड प्रभाग उपविजेता .
ज्ञानी मी होणार लहान गट
पडेल प्रभाग विजेता.शिरगाव प्रभाग उपविजेता
समूह गीत लहान गट
फणसगाव  प्रभाग विजेता.देवगड प्रभाग उपविजेता .
समूह नृत्य लहान गट
देवगड प्रभाग विजेता.शिरगाव प्रभाग उपविजेता.
मोठा गट निकाल पुढील प्रमाणे
100 मी धावणे मुलगे
आदित्य गुरव प्रथम, पडेल प्रभाग ,हार्दिक बाणे द्वितीय प्रभाग पडेल  विघ्नेश कदम तृतीय मिठ बाव प्रभाग.
100मी धावणे मुली
भक्ती लब्दे प्रथम प्रभाग मिठबाव ,प्राजक्ता रुपये द्वितीय मिठबाव प्रभाग, जान्हवी लाखन तृतीय पडेल प्रभाग.
200मी धावणे मुलगे
आर्यन इळकर प्रथम पडेल प्रभाग. सुबोध कदम द्वितीय शिरगाव प्रभाग. निखिल परब तृतीय देवगड प्रभाग .
200मी धावणे मुली
समिक्षा खोत प्रथम ,मिठबाव प्रभाग .दीक्षा धुरी द्वितीय ,मिठबाव प्रभाग.  जान्हवी लाखन तृतीय पडेल प्रभाग.
लांब उडी मुलगे
गितेश पोयरेकर  प्रथम ,शिरगाव प्रभाग. सवेश नाणेरकर  द्वितीय मिठबाव प्रभाग . श्रेयस बाणे तृतीय फणसगाव प्रभाग.
लांब उडी मुली
दिक्षा बंदरकर प्रथम , फणसगाव प्रभाग . दिक्षा धुर  द्वितीय , मिठबाव प्रभाग . मृगाक्षी हिर्लेकर तृतीय मिठबाव प्रभाग .
उंच उडी मुलगे
सौरभ हिंदळेकर प्रथम , मिठबाव प्रभाग . स्वामीराज मासिये, द्वितीय , देवगड  प्रभाग,जयेश पवार तृतीय शिरगाव प्रभाग .
उचं उडी मुली
देवांशी दुधवडकर  प्रथम ,फणस गाव  प्रभाग,. सान्वी बाणे द्वितीय फणसगाव प्रभाग . जान्हवी गावकर तृतीय शिरगाव प्रभाग
गोळा फेक मुलगे
आदित्य गुरव प्रथम पडेल प्रभाग. निमित मुळम द्वितीय पडेल प्रभाग . विघ्नेश कदम मिठबाव प्रभाग
गोळा फेक मुली
तनिष्का वारीक प्रथम देवगड प्रभाग पूनम कदम व्दितीय मिठबाव प्रभाग मुसिरा पनलेकर तृतीय देवगड प्रभाग
कबड्डी मुलगे मोठा गट
पडेल प्रभाग विजेता.मिठबाव प्रभाग उपविजेता.
कबड्डी मुली
पडेल प्रभाग विजेता  .देवगड प्रभाग उपविजेता .
खो खो मुलगे
पडेल प्रभाग विजेता .शिरगाव प्रभाग उपविजेता
खो खो मुली
फणस गाव प्रभाग विजेता .देवगड प्रभाग उप विजेता  .
रिले मुलगे
पडेल प्रभाग विजेता.फणासगाव प्रभाग उपविजेता
रिले मुली
मिठबाव प्रभाग विजेता
फणसगाव प्रभाग उपविजेता
ज्ञानी मी होणार मोठा गट
पडेल प्रभाग विजेता. मिठबाव प्रभाग उपविजेता
समूह गीत मोठागट
फणसगाव  प्रभाग विजेता. शिरगाव प्रभाग उपविजेता .
समूह नृत्य मोठा गट
देवगड प्रभाग विजेता. फणसगाव प्रभाग उपविजेता.
दोन दिवस झालेल्या स्पर्धांमध्ये पडेल प्रभागाने आपला ठसा उमटविला
सर्वसाधारण विजेता मुली , सर्वसाधारण विजेता मुलगे आणि सर्वसाधारण विजेता प्रभाग असे विजेते पद पडेल प्रभागाने प्राप्त केले .

दुसऱ्या दिवशी दिनांक 30 डिसेंबर रोजी गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात लहान व मोठ्या गटाच्या समूह गीत व समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच लहान व मोठ्या गटाच्या ज्ञानी मी होणार या प्रश्न मंजुषा स्पर्धा पंचायत समिती देवगड येथील छ्त्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आल्या.

स्पर्धा यशस्वीतेसाठी  पंचायत समिती देवगड शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी पंचायत समिती देवगडचे अधिकारी, कर्मचारी, बी आर सी स्टाफ सर्व पंच ,परीक्षक यांनी मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी आनंद जाधव यांनी दोन्ही दिवस पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. रमेश मालंडकर, लालन कोयंडे, प्रमोद ढोके, शुभदा लोके, या सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत देणगी स्वरूपात केली याबद्दल पंचायत समिती देवगड च्या वतीने सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी मानले.