वायंगणी  श्री स्वामी सेवा मंडळाचे अध्यक्षपदी सदानंद राणे तर सचिव पदी सुनील खरात यांची निवड

52

वायंगणी  श्री स्वामी सेवा मंडळाचे अध्यक्षपदी सदानंद राणे तर सचिव पदी सुनील खरात यांची निवड

आचरा (प्रतिनिधी) 

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी या नेसायच्या या नेसायच्या अध्यक्षपदी सदानंद राणे तर सचिव पदी सुनील खरात यांची निवड करण्यात आली आहे .श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी या न्यासाची २० वी वार्षिक सभा नुकतीच न्यासाच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी 2024 ते 2026 या कालावधी साठी नवीन कार्यकारी मंडळ नेमण्यात आले.

  1. या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून सदानंद राणे यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी चंद्रकांत हडकर ,उपाध्यक्ष दिनेश साळकर, दीपक सुर्वे, सुनील खरात, सहसचिव कल्याण साळकर, खजिनदार प्रफुल्ल माळकर, सल्लागार रामदास प्रभू , पंडित खोत,सदस्य सुधीर घागरे, संचिता राणे याप्रमाणे नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी संस्थापक सदस्य यशवंत परब यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष सदानंद राणे तसेच नवनिर्वाचित  पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सदानंद राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेचे कार्य असेच सेवाभावी वृत्तीने चालू ठेवणार असल्याचे मत व्यक्त केले. तर कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर यांनी उपस्थित त्यांचे आभार व्यक्त केले.