देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांची घेतली भाजपा शिष्यमंडळाने भेट
देवगड (प्रतिनिधी) दि. २७ जानेवारी २०२४
देवगड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नूतन पोलीस निरीक्षक म्हणून भरत धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. देवगड तालुका भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांच्या पुढील प्रशासकीय सेवेत शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, जिल्हा चिटणीस तथा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, तालुका सचिव शरद ठुकरूल, युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश पाटकर, दयानंद पाटील आदीसह उपस्थित होते.





