छेडले उपोषणाचे हत्यार ; मागण्या झाल्या मान्य
सावंतवाडी (हेमंत मराठे)
आपल्यावर अन्याय कारक कारवाई झाल्याबद्दल सावंतवाडी आगारातील चालक शिवराम दिनकर मुळीक यांनी न्याय मिळावा यासाठी 26 जानेवारी ला छेडलेल्या उपोषणावेळीआगार प्रमुख यांनी लेखी आश्वासन देऊन शिवराम मुळे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने सुरांमुळे घेणे आपले उपोषण पुरता स्थगित केले आहे.
विनाकारण गैरहजर ठेवल्यासंदर्भात व अतिकालीक भत्यासंदर्भात तक्रारीचे निवेदन आगार व्यवस्थापक, सावंतवाडी यांना सादर केले होते. परंतु त्यांनी या आगाराचे आगार व्यवस्थापक या नात्याने सदरच्या तक्रार अर्जाची कोणतीही दखल घेतलेली नाही व आपल्या तक्रारीचे निवारण केले नाही तसेच दि.१८/०५/२०२२ ते दि.०९/०६/२०२२ या कालावधीत प्रशासनाने आपणाला निलंबित केले मात्र सदर कालावधीची आपली रजा खर्च करुन पगार काढला. मग मला निलंबित का केले? किंवा रजा खर्च का केली? याचा खुलासा करावा. अशा इतर मागण्यांसाठी चालक शिवराम मुळीक यांनी सावंतवाडी आगारात26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी आपले मुदत उपोषण सोडले होते मात्र सदर उपोषणावेळी सावंतवाडी आगार प्रमुख यांनी शिवराम मुळे यांच्यानिवेदनातून केलेल्या मागण्यावर पंधरा दिवसात योग्य कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने मुळे यांनी आपले उपोषण स्थगित केले





