स्वच्छ सुंदर सेंटेड देवगड शहर असा संदेश दिल्याने आता तरी प्रशासन जागे होणार का ?

25

स्वच्छ सुंदर सेंटेड देवगड शहर असा संदेश दिल्याने आता तरी प्रशासन जागे होणार का ?

देवगड (प्रतिनिधी)

प्रशासनामार्फत स्वच्छ भारत अभियाने राबवली जाते. या अभियानातून प्रशासनाची स्वच्छता कमी आणि फोटोसेशन जास्त दिसते. स्वच्छता सर्वेक्षणात शहरे नंबर वन होतात मात्र प्रत्यक्षात स्वच्छता होत आहे का आज कित्येक ठिकाणी उघडी गटारी आणि सांडपाण्याचे समस्या असल्याने असंख्य नागरिक,वाहनचालक त्रस्त झालेले आहेत.

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगड निपाणी मुख्य मार्ग नजीक कॉलेज रोड ते मांजरेकर नाका पर्यंत असणाऱ्या गटारातून सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीत होत नसल्याने या सांडपाण्यांच्या दुर्गंधीचा त्रास येथील स्थानिक नागरिक व दुकान व्यावसायिक यांना होत आहे. या ठिकाणी बंद स्वरूपाचे गटार अर्धवट स्थितीत बांधण्यात आले मात्र त्या पुढील गटार हे अद्याप बांधलेलेच नाही. मात्र हे बंदिस्त बांधलेले गटार ठरवलं साध्या पादचारी चालून गेला तरीही कोसळते. अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम हे करण्यात आले होते.

    देवगड कॉलेज रोडवर असलेल्या विविध कॉम्प्लेक्स मध्ये सांडपाणी देवगड निपाणी रोडच्या हम रस्त्यावर वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येथे पसरली आहे . त्यामुळे येथील नागरिकांना डासांचा त्रास देखील होत आहे वारंवार प्रशासनाला कळवून देखील प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केलेली असल्याने अखेर कंटाळून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चक्क स्वच्छ सुंदर सेंटेंड देवगड शहर असे नामफलक रस्त्यावर लिहून प्रशासनासहित लोकप्रतिनिधिंचे लक्ष वेधले आहे.
तेव्हा मालकी हक्क कोणाचा यावर चर्चा करण्यापेक्षा संबंधित प्रशासनाने देवगड जामसंडे शहराची वाढती लोकप्रियता पहाता सामोपचाराने या दुर्गंधीवर तोडगा काढणे आवश्यक आहे.