सुर्यकांत आडेलकर यांचं कौतुकास्पद काम…! | गोव्यात जात केलं रक्तदान

सावंतवाडी : गोवा बांबोळी येथे अॅडमिट असलेल्या संजय शंकर सावंत रा. ओवळीये या रुग्णाला (O- निगेटिव्ह ) या दुर्मिळ रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. हे कळताच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर यांनी आपली ड्युटी संपवून सकाळी स्वतः गोवा बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले त्याबद्दल युवा रक्तदाता संघटनेने त्यांचे अभिनंदन केलं.