राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी आजोबा दिवस…!

मुंबई : शालेय वयात मुलांच्या जडणघडणीत आजी आजोबांची महत्वाची भूमिका असते. मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

रविवार १० सप्टेंबर रोजी असलेला हा दिवस त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणार आहे. काही कारणास्तव शाळेला सदर कार्यक्रमाचे आयोजन न करता आल्यास शाळेकडून आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, यासंदर्भात शासनाने परिपत्रकदेखील जारी केले आहे.