शहरी विभाग साईनाथ गावकर, श्रीकृष्ण रानडे तर ग्रामीण विभाग शंकर मुणगेकर , राजेंद्र साटम यांना जाहीर
देवगड तालुका पत्रकार समितीचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर ; २० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर जयंती दिनी होणार वितरण
देवगड प्रतिनिधी
देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे आदयपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरनार्थ तालुका आदर्श पुरस्कार जाहिर करण्यात आले असून शहरी विभागासाठी श्रीकृष्ण रानडे व साईनाथ गावकर यांना तर ग्रामीण विभागासाठी शंकर मुणगेकर, राजेंद्र साटम यांना जाहिर करण्यात आले आहे. तर सेवा भावी संस्था म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांना जाहिर करण्यात आले आहेत. सदर पुरस्काराचे वितरण पोंभुर्ले येथे 20 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येणार आहेत.
देवगड तालुका पत्रकार समितीची सभा शासकिय विश्रामगृह येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये सन 2023-2024 चे आदयपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरनार्थ देण्यात येणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले. यावेळी पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर,उपाध्यक्ष दयानंद मांगले,अनिल राणे, सचिव सचिन लळीत,संतोष कुळकर्णी,प्रशांत वाडेकर,जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य राजेंद्र मुंबरकर,राजेंद्र साटम,महेश तेली,सुरज कोयंडे आदी उपस्थित होते. २० फेब्रुवारी रोजी आदयपत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती असून हि जयंती पोंभुर्ले येथे दरवर्षी देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने साजरी करण्यात येते याचवेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदयपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणा-या आदर्श शहरी विभाग व ग्रामीण विभागाचे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.





