राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर

18

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर

सावंतवाडी (प्रतिनिधी)

देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस 22 जानेवारी २०२४. प्रभू श्रीराम भक्तांनी पाहिलेले स्वप्न जवळपास 500 वर्षांनी पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे अयोध्यनगरी बरोबर देशभरातील सर्व मंदीरामध्ये विविध कार्यक्रम होत असून देशात  दिवाळी निर्मित वातावरण निर्माण झाले  आहे.

याच प्रभू श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त 22 जानेवारी 2024 ला राज्य शासनाकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.या दिवशी राज्यांमध्ये सर्व शाळा – महाविद्यालये,शासकीय आस्थापना, त्याचबरोबर दारुचेही दुकान बंद असणार आहेत.

२२ जानेवारीला उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे श्री. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याने देशभरातील लाखो भाविक उपस्थित होणार आहेत. त्या निमित्ताने अनेक राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.