रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या वतीने आसन व्यवस्था

40

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या वतीने आसन व्यवस्था

देवगड (प्रतिनिधी)

देवगड मध्ये काही ठिकाणी गर्दीच्या वेळी लहान मुले, स्त्रिया तसेच वृद्धांसाठी बसण्याची गैरसोय होते. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेवून आज रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या वतीने तीन ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आली.सदर बैठक व्यवस्था ग्रामीण रुग्णालय देवगड, स्टेट बॅंक ऑफ इंडिया देवगड तसेच ब्राह्मण देव मंदिर येथे करण्यात आली आहे.आसन व्यवस्था लोकार्पण पत्रकार श्री.संतोष कुलकर्णी,पत्रकार अध्यक्ष श्री अयोध्याप्रसाद गावकर व पत्रकार श्री सुरज कोयंडे, रोटरी प्रेसिडेंट प्रविण पोकळे, चार्टर्ड प्रेसिडेन्ट हनीफ मेमन ह्यांच्या उपस्थित करण्यात आला. ह्यावेळी रोटरीचे अन्य पदाधिकारी रो दयानंद पाटील, रो अनुश्री पारकर, रो मनीषा डामरी ,रो नरेश डामरी ,रो अनिल कोरगावकर ,रो विजय बांदिवडेकर, रो गौरव पारकर, रो अनिल गांधी देखील उपस्थित होते.