या कारणामुळे देवगड आगाराच्या 16 एसटी फेऱ्या अचानक रद्द ; प्रवाशांचे हाल

59

या कारणामुळे देवगड आगाराच्या 16 एसटी

देवगड (प्रतिनिधी)

रायगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे आगारातून सुमारे 16 गाड्या त्या ठिकाणी पाठवण्यात आल्या असल्याचे आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी सांगितले. तसेच या गाड्या 11,12,13 या तीन दिवस रायगडात असल्यामुळे तीन दिवस याचा फटका प्रवाशांना निश्चित बसणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.तसेच विजयदुर्ग आगारातून देखील दहा एसटी गेल्याचे त्यांनी सांगितले.

देवगड आगारातून रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे तांबळडेग फोंडा 8.20, रत्नागिरी 5.00, नाटे रत्नागिरी 6.45, रत्नागिरी 8.30, बेळगाव 7.15, बेळगाव 11.50,पणजी 11.30, पणजी 6.00, कुंभवडे 6.30, सावंतवाडी 6.45,तांबळडेग 12.15, आचरा 11.45, निरोम 12.30, आचरा कणकवली 9.30, मोर्वे 12.00,आचरा 11.30,तुळजापूर 9.00, सांगली 12.30, कणकवली 9.30, मालवण 15.30,कुणकवन 17.00, बोडकवाडी 15.45 नरसाळेवाडी 15.10, गोवळ 16.35 या प्रवासी फेऱ्या रद्द केल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासांचे मोठे हाल होता असले तरी त्यांना आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे.