वेंगुर्ले पोलिसांचा “अमली पदार्थ विरोधी जनजागृती” रथ “
बांदा (मंगल कामत)
अमली पदार्थांच्या विळख्यात सध्या अनेक तरुण-तरुणी व नागरिक सापडत आहेत.याबाबतची जनजागृती करून त्याला आळा घालण्यासाठी वेंगुर्ला पोलीस ठाण्यामार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज पोलिसांच्या वाहनाचा “अमली पदार्थ विरोधी जनजागृती रथ” तयार करून तो तालुक्यात जनजागृतीसाठी फिरवण्यात येणार आहे.
या रथाचा शुभारंभ वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला.
अमली पदार्थांमध्ये अडकत चाललेल्या युवा पिढीला यातून बाहेर काढणे गरजेचे आहे.तसे शासन स्तरावरून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.मात्र पालकांनीही आपल्या पाल्याचा पाय चुकीच्या मार्गावर पडत नाही ना याकडे लक्ष ठेवणेही गरज आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग या अंमली पदार्थ विरोधात कारवाई करत आहे.ही कारवाई करताना समाजामध्ये या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि अमली पदार्थ विरोधी कृती करणे किती गरजेचे आहे.याबाबत जनजागृती आवश्यक आहे.म्हणून वेंगुर्ले पोलीस निरीक्षक जाधव यांनी आपल्या वाहनावर अशा जनजागृती करणारी पोस्टर लावून हा जनजागृती रथ बनवला आहे.हा रथ वेंगुर्ला तालुक्यात सर्व महाविद्यालय,शाळा, सार्वजनिक चौक,बस स्थानक, बाजारपेठ येथे जाऊन जनजागृती करणार आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव,ट्रॅफिक पोलीस हवालदार मनोज परुळेकर,गौरव परब,महिला पोलीस हवालदार रंजीता चौहान,दीपा मठकर,सौ.कदम,पोलीस हवालदार योगेश वेंगुर्लेकर,सुरेश पाटील,रमेश तावडे,अमर कांडर,शिवशंकर सावंत, बंटी सावंत,होमगार्ड पांडुरंग मठकर, चैताली निवजेकर,शिल्पा हळदणकर, श्रीमती वेंगुर्लेकर,पालव,शेळके आदी उपस्थित होते.





