वैभववाडी : योग्य पुनर्वसनासाठी वैभववाडीत स्टॉल धारकांनी उपोषण सुरू केले आहे. वैभववाडी शहरात अनधिकृत असलेल्या स्टॉल धारकांना स्टॉल हटविण्याबाबत वैभववाडी नगरपंचायत मार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. या विरोधात स्टॉल धारकांनी उपोषण सुरू केले. आमचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो त्यामुळे जो पर्यंत स्टॉल धारकांचे पुनर्वसन होत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.





