दोडामार्ग : पाळये तिठा येथे काल रात्री दुचाकी च्या समोर अचानक गवारेडा आडवा आल्याने अंजुमन थॉमस नावाच्या केरळयीन युवकाचा अपघात झाला व त्याला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी गोवा येथे दाखल करण्यात आले.
काल रात्री अंजुमन दुचाकी वरून पाळये तिठा येथून जात असताना गवा रेडा अचानक रस्त्यावर दुचाकीच्या समोर आल्याने अपघात झाला. व त्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान सरपंच सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण गवस हे त्या रस्त्यावरून जात असताना त्याच्या निदर्शनास आले, जखमी युवकाला आपल्या चार चाकी वाहनाने साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमीवर साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले व त्यानंतर त्याला अधिक उपचारा साठी १०८ रुग्णवाहिकेने गोवा येथे हलविण्यात आले.





