शिवलाल यादव सर यांचे सेवार्थ उपक्रम कौतुकास्पद भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे गौरवोद्गार
कोकण कट्टा दिनदर्शिकेचे दिमाखात प्रकाशन
मुंबई (प्रतिनिधी)
शिवलाल यादव सर यांचे सेवार्थ उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवद्गार भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शिवलाल यादव सर यांनी सामाजिक, शैक्षणिक, व इतर क्षेत्रातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचेही ते म्हणाले. यावेळी कोकणकट्टा संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या 2024 च्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्या दरम्यान ते बोलत होते.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते व आमदार परागजी अळवणी, मुंबई भाजपा महामंत्री संजय उपाध्याय ,उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष नगरसेवक सुषम सावंत यांच्या उपस्थितीत 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दिमाखात संपन्न झाले.
यावेळी युवा मोर्चा जिल्हा मंत्री शिवलाल यादव , कोकण कट्टा चे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे, सुजित जाधव, आदीसह कोकणकट्टाचे पदाधिकारी उपस्थित होते.





