देवगड तालुका मराठा समाज व शुभारंभ अकॅडमी तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग

286

देवगड तालुका मराठा समाज व शुभारंभ अकॅडमी तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग

देवगड (स्वप्नील लोके)

देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उज्वल यश प्राप्त व्हावे या उद्देशाने देवगड मराठा समाज व शुभारंभ अकॅडमी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि ७ जानेवारी २०२४ रोजी स १० ते दु १ या वेळेत इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी देवगड येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले आहे.

अनेक विध्यार्थी व पालकांना दहावी नंतर काय करावे हा प्रश्न पडत असतो. याकरिता या वर्ग मार्गदर्शन वर्गामध्ये तालुक्यातील इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत सहभागी व्हावे. तसेच हा मार्गदर्शन वर्ग समाजातर्फे विनामूल्य आयोजित केलेला आहे. अधिक माहितीसाठी योगेश राणे (9423304050) विजय (बंटी )कदम (9422584519) यांच्याशी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी श्री संजीव राऊत यांच्याशी संपर्क साधावा. तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन वर्गासाठी पाठवावे असे आवाहन तालुकाध्यक्ष श्री संदीप साटम आणि कार्यवाह केदार सावंत तसेच तालुका कार्यकारणीच्या वतीने करण्यात आलेले आहे.