कुणकेश्वर समुद्रात नौकेवरून तोल जाऊन खलाशी समुद्रात पडला.

384

कुणकेश्वर समुद्रात नौकेवरून तोल जाऊन खलाशी समुद्रात पडला.

देवगड(प्रतिनिधी)

देवगड मधील गजानन प्रसार नौकेवरील खलाशी कुणकेश्वर समुद्रात तोल जाऊन पाण्यात पडला . ही घटना ४ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड बंदरातील राहुल हर्णेकर यांच्या मालकीची गजानन प्रसार ही मच्छीमारी नौका दिनांक 3 जानेवारी रोजी सायंकाळी 3:30 वाजता समुद्रात गेली होती. ४ जानेवारी रोजी सकाळी ६ वा. सुमारास कुणकेश्वर समुद्रात मच्छीमारी करीत असताना नौकेवरील खलाशी धनेश बिफल राम (३७) रा .बंगूरकेला छत्तीसगड हा तोल जाऊन पाण्यात पडला . त्याचा शोध घेऊन ही तो सापडला नाही त्यामुळे तो नापत्या असल्याची तक्रार नौकेवरील खलाशी सुरेंद्र फन्साई डोमरा राहणार झारखंड यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून याबाबतच्या अधिक तपास पो .हे. कॉ .सौ.एस .एस.सावंत करीत आहेत.