अन्यथा २६ जानेवारीला रिकाम्या दारुच्या बाटल्या घेवून बांदा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करू,

64

 

अन्यथा २६ जानेवारीला रिकाम्या दारुच्या बाटल्या घेवून बांदा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करू,

सावंतवाडी(हेमंत मराठे)

बांदा येथील पोलिस तपासणी नाक्यावरुन राजरोसपणे दारुची वाहतूक होत आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ बंद करण्यात यावा, अन्यथा २६ जानेवारीला रिकाम्या दारुच्या बाटल्या घेवून बांदा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करू, असा इशारा सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेयस मूंज यांनी दिला आहे. दरम्यान काळ्या काचा लावून राजरोसपणे दारुची वाहतूक करणाऱ्या अवैध धंदेवाईकांच्या मागे काही खाकी वर्दीतील कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अशा लोकांचा शोध घेवून कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, बांदा तपासणी नाक्यावरुन राजरोसपणे अनेक गाड्या दारु वाहतूक करीत आहे. यातील काही गाड्या या एमएच ०७ या नंबरच्या आहेत. मात्र त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे यामागे खाकीचा दुर्लक्ष होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे आपण केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेवून संबंधितावर योग्य ती कारवाई करा, अन्यथा २६ जानेवारीला दारुच्या रिकाम्या बाटल्या घेवून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.