Home क्रीडा तालुकास्तरीय ज्ञानी मी होणार महोत्सवात जि प तळेबाजार शाळेचे यश

तालुकास्तरीय ज्ञानी मी होणार महोत्सवात जि प तळेबाजार शाळेचे यश

542

तालुकास्तरीय ज्ञानी मी होणार महोत्सवात जि प तळेबाजार शाळेचे यश

देवगड (स्वप्नील लोके)

देवगड येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कला क्रीडा सांस्कृतिक, ज्ञानी मी नेहमी होणार महोत्सवात जिल्हा परिषद तळेबाजार शाळेचे विद्यार्थी आयुष सुभाष झोरे 50 मीटर धावणे द्वितीय क्रमांक . शुभ्रा प्रशांत ठाकूर लांब उडी द्वितीय क्रमांक, यांनी उज्वल यश संपादन केले. या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तत्पूर्वी केंद्र तळवडेच्या स्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेबाजारच्या विद्यार्थिनी समूहगीत प्रथम , समुहनृत्य प्रथम क्रमांक, ज्ञानी मी होणार मध्ये सान्वी शिरोडकर, संचिता देसाई यांनी द्वितीय क्रमांक. आयुष झोरे, 50 मीटर धावणे प्रथम, श्रीराम राऊत 100 मीटर धावणे द्वितीय, आयुष झोरे लांब उडी प्रथम, रिया दामगुडे 50 मीटर धावणे प्रथम, शुभ्रा ठाकूर १०० मीटर धावणे द्वितीय, सान्वी शिरोडकर उंचवडी, शुभ्रा ठाकूर लांब उडी प्रथम, पन्नास मीटर रिले द्वितीय क्रमांक अशा सर्व क्रीडा प्रकारांमध्ये जे संपादन केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री समीर कुडाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख श्री आनंद राजम, मुख्याध्यापक कुडाळकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर शिरवडकर ,अध्यक्ष रुपेश माणगावकर यांनी अभिनंदन करत या मुलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.