नाडण गावातील विकास कामांचे भूमिपूजन
देवगड (स्वप्नील लोके)
प्र.जि.मा. १० ते नाडण पुजारेवाडी, वारीकवाडी मार्ग ग्रा. मा. -५५ खडीकरण व डांबरीकरण करणे या दहा लाख रुपये खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे काम जिल्हा वार्षिक योजना या योजनेतून घेण्यात आले आहे.
माजी आमदार अँड अजित गोगटे,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, व अन्य भाजपा पदाधिकारी अधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.





