खासदार भाजपचाच असेल – केंद्रीय मंत्री नारायण राणे

28

खासदार भाजपचाच असेल – केंद्रीय मंत्री नारायण राणे

कुडाळ | प्रतिनिधी

रत्नागिरी -सिंधुदुर्ग खासदारकी उमेदवारीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदारकी उमेदवारी बाबत कोणतीही चर्चा नाही. कुस्ती नाही, खो खो नाही, कबड्डी नाही. आमच्याकडे जे होईल ते सामोपचाराने होईल. जो उमेदवार असेल तो नक्की १०० टक्के जिंकेल. खासदार आमचा असेल. आता जे टिवटिव करणारे आहेत, ते बंद होईल. या जागेवर भाजप अधिकार सांगेल. असे पत्रकारांशी बोलताना सांगितले

श्री राणे आज सायंकाळी कुडाळ येथे आले होते यावेळी पत्रकार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलत होते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीराम यांच्यावरील वक्तव्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, आव्हाड आणि मातोश्री बद्दल काही बोलायचे नाही. ते सध्या घसरलेत. सत्ता गेल्याने ते डिप्रेशनमध्ये आहेत. आमच्या देवतांवर त्यांनी बोलायचे धाडस करू नये. मग त्यांना शेवटी राम करावा लागेल.

राष्ट्रवादीच्या शिबिरात आज अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले की, आपल्या विचारांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर ईडीचा वापर करून दबाव आणला जातोय. यावर नारायण राणे म्हणाले की, मला पवार साहेब काय बोलले ते माहीत नाही. ते जेष्ठ नेते आहेत. ते काय बोलले ते मी खात्री करेन. मात्र, आमचे सरकार ज्यांच्यावर काँग्रेस राजवटीपासून ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यावर ईडी किंवा सीबीआयकडून कारवाई होतेय. अनिल देशमुख हा काय साधुसंत नव्हता ! महिन्याला पैसे मागत होता, त्याचे पुरावे मिळालेत. ईडी त्या आधारे कळते. पवार साहेबांना वाईट वाटायची गरज काय ? ते दिल्लीत असताना काही बोलायाचे नाहीत. आम्ही विरोधक म्हणून पाहत नाही. ज्यांनी आरोप केला त्याच्या विरुद्ध कारवाई होणार महानंद प्रकल्पाबाबत संजय राऊत यांनी आरोप केलाय त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत पागल झालाय.सहा महिने महानंदच्या कामगारांना पगार नाही, मी याबाबत आता प्रस्ताव ठेवलाय की, एनडीबीने महानंद चालवायला घ्यावी. असे सांगितले.