सावंतवाडी शिरोडा रस्त्यावर अवैधपणे चिर वाहतूक करणारा डंपर पकडला

85

 

सावंतवाडी शिरोडा रस्त्यावर अवैधपणे चिर वाहतूक करणारा डंपर पकडला

सावंतवाडी – (हेमंत मराठे)

सावंतवाडी शिरोडा रस्त्यावर अवैधपणे चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरवर प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी कारवाई केली.
मळेवाड तळवणे,आरोन्दा, आजगाव,धाकोरे परिसरात मोठ्या प्रमाणात जांभा दगड उत्खनन करणाऱ्या चिरेखाणी आहेत.सावंतवाडी शिरोडा सावंतवाडी सातार्डा सावंतवाडी,आरोन्दा,शिरोडा या मार्गावर मोठ्या प्रमाणात जांभा दगडाची वाहतूक होते.अशीच जांभा दगडाची शिरोडा सावंतवाडी मार्गावर डंपरने वाहतूक होत असताना सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी तपासणी करता गाडी थांबवली असता सदरची जांभा दगडाची वाहतूक ही अवैध असल्याचे दिसून आले.यामुळे पानवेकर यांनी आजगाव मंडळ अधिकारी कोदे यांना सदर गाडी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यांच्यासोबत आजगाव तलाठी सी नागराज व तळवणे तलाठी पोले होते.या कारवाईमुळे अवैध चिरेवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे दाबे दलाले आहेत.