संचालकांची प्रांताधिका-यांकडे मागणी; घडलेल्या घटनेचा निषेध…

70

संचालकांची प्रांताधिका-यांकडे मागणी; घडलेल्या घटनेचा निषेध…

सावंतवाडी ई- सेवा तोडफोड प्रकरण

सावंतवाडी – (हेमंत मराठे)

 

सावंतवाडी शहरातील मच्छी मार्केट जवळील ई-सेवा केंद्राची तोडफोड करणाऱ्या युवकाच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव पाठवा, अशी मागणी सावंतवाडीतील ई- सेवा केंद्र संचालकांनी सावंतवाडी प्रांताधिका-यांकडे केली आहे.
सावंतवाडीतील ई-सेवा केंद्र चालकांनी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची भेट घेऊन ई-सेवा केंद्राच्या तोडफोडी प्रकरणाबाबत चर्चा केली. तसेच तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मुंज यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

यावेळी आकाश मिसाळ, संदेश कल्याणकर, सौरभ सिध्दये, शैलेश जाधव, सुशील आमोणेकर, श्रेयस मुंज आदी उपस्थित होते. यातील तक्रारदार मुंज यांच्या ई-सेवा केंद्रात घुसून प्रवीण उर्फ देवबा देऊलकर या व्यक्तीने त्या ठिकाणी तोडफोड केली होती. झालेला प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.