कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंबडपाल ग्रामपंचायतीवर धीरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढाईत अखेर गोट्या चव्हाण यांनी आपला गड राखलाय. कुडाळ तालुक्यातील स्वयंघोषित नेत्यांनी ग्रामपंचायत सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला असे वीरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी सांगितले. परंतु त्यामध्ये ते यशस्वी ठरले नाहीत, त्यांचे मनसुबे उधळून सर्व सदस्य ठाम राहिले.
धिरेंद्र चव्हाण यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवडून दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत धीरेंद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले. गोट्या चव्हाण हे वयाने लहान असले तरी मागील 5 वर्षात सदस्य असताना अनेक विकास कामे खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून मार्गी लावली. पुन्हा एकदा मतदारांनी पुन्हा विश्वास दाखविला आहे ह्याचा फायदा नक्कीच होणार आहे ह्यात शंका नाही असे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी प्रमोद सावंत, पुंडलिक नाईक, विष्णू वंजारे, सदस्य प्रसाद नाईक, रोहिणी सावंत, वैष्णवी चव्हाण, स्मिता नाईक आदि उपस्थित होते.





