कोटकामतेच्या सर्सवांगीण विकासासाठी सर्व पॅनल काम करणार

137

देवगड : ग्रामपंचायत कोटकामते निवडणुक 2022 संपन्न झाली. ही निवडणूक तिन वेगवेगळ्या पॅनलनी लढवीली. आई श्री देवी भगवतीच्या कृपेने सर्वाना हवे तसे यश जरी मिळालेले नसले तरी तीने सर्वाची चांगलीच परीक्षा घेतली हे निवडणुकीच्या निर्णयावरुन दीसुन येते. तिनही पँनल आपापले विकासात्मक मुद्दे घेऊन या निवडणुकीत उतरले होते.

आपापले मुद्दे व उध्दिष्ट लोकांसमोर ठेवत होते. ही निवडणुक श्री देवी भगवती ग्रामविकास पॅनल या नावाने लढविली होती. भ्रष्टाचार विरोधी ग्रामविकास पॅनल यांनी देखील ही निवडणूक लढविलेली होती. तरुण व होतकरु उमेदवार असणाऱ्या या पॅनलचे तिन उमेदवार निवडून आले.

विकासात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व याआगोदरची गावाच्या विकासाची ओढ लक्षात घेऊन आम्ही यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे ठराविलेले आहे. अशा उमेदवारांना प्रोत्साहन दील्यास गावाचा सर्वागीण विकास लवकर होईल यात तिळमात्र शंका नाही म्हणून, आम्ही दोन्ही पॅनल गाव पॅनल म्हणून एकत्र येऊन एकत्रितपणे काम करु आणि त्यास आम्ही कटीबद्द असु असे, ऋतुजा राकेश खाजणवाडकर, गणेश घाड़ी यांनी पदभार स्विकारल्यावर जाहिर केले.