११ ते १४ जानेवारी या कालावधीत कणकवली पर्यटन महोत्सव.

89

११ ते १४ जानेवारी या कालावधीत कणकवली पर्यटन महोत्सव.

कणकवली , दि ०३

कणकवली पर्यटन महोत्सव २०२४ च्या महोत्सव स्थळाच्या ठिकाणी व्यासपीठ उभारणीसह अन्य कामांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली पर्यटन महोत्सव 11 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत होणार असून या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील नामवंत कलाकार यांच्यासह स्थानिक कलाकारांचा देखील सांस्कृतिक कार्यक्रम येथे होणार आहे. या महोत्सवाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या स्थळी भव्य व्यासपीठ उभारले जाणार असून या सर्व कामांचा शुभारंभ बुधवार 3 जानेवारी 2024 रोजी अबीद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, रवींद्र गायकवाड, राजू गववाणकर,
शहराध्यक्ष अण्णा कोदे,ऋतिक नलावडे पंकज झेमणे राजा पाटकर आधी उपस्थित होते.